Pages

Saturday 4 February 2012

गड आला पण सिंह गेला

४ फेब्रुवारी १६७० -गड आला पण सिंह गेला ...वीर तानाजी मालुसरे 

४ फेब्रुवारीच्या संध्याकाळी तानाजीने सर्व मावळ्यांसह राजगड सोडला.गुंजवणी नदी ओलांडली,सर्वजन विंडसई खिंडित पोचले.तोपर्यंत अंधार पडला होता.मशाल पेटवणे महा-धोक्याचे होते.अंधारात अंदाजानेच पाऊल टाकावे लगत होते.मध्यरात्रीनंतर सारे डोणागिरिच्या कड्याच्याजवळ जमा झाले.दोन मावळ्यांना हा कडा त्याच्या खाचा-खोचांसकट माहित होता.कमरेला दोर बांधून हे वीर झपा-झप कडा वर चढून गेले.मात्र यावेळी कडा चढताना सहा मावळे कड्यावरुन पडून मरण पावले.त्यांची नावे आजही इतिहासाला अज्ञात आहेत.कड्याच्या वरच्या अंगाला दोर बांधण्यात आले.दोराच्या आधाराने सारे मावळे वर आले अन घात झाला.उदयभानुला खबर लागली की कुणीतरी दोर चढून किल्ल्यावर घुसतय.एकच गोंधळ उडाला.चंद्रोदय झाला होता व् अगदी धूसर प्रकाश होता.गड जागा होत आहे याची चाहुल लागताच मराठयानी शस्त्रे परजली आणि सैनिकांच्या वस्तीवर धावले.काही सैनिक जागे होण्याच्या आतच त्याना मराठयानी कापून काढले.थोड्याच वेळात गडावर तीनशे मराठे आणि १५०० मोगली सैनिक असा सामना जुम्पला.
मराठ्यापुढे यश किंवा मृत्यु असे दोनच पर्याय उपलब्ध होते.सहाजिकच त्यांचा आवेश विलक्षण होता

तानाजी व् सूर्याजी सैनिकाना प्रोत्साहन देत सर्वत्र फिरत होते.उदय भानुने तानाजीला हेरले आणि तो तानाजीकडे धावला.दोघानाही जखमा होत होत्या.उदयभानुच्या जोरकस वाराला अडवन्यासाठी तानाजीने ढाल पुढे केली आणि दुर्दैवाने ती ढालच तुटली.आत तानाजी उघडा पडला आणि उदय भानु जोशात आला.मर्मस्थानी वार बसून तानाजी घायल होवून खाली पडला आणि थोड्याच वेळात वीर गतीला गेला.उदयभानुही जखमा आणि रक्तस्त्रावाने खचला होता.थोड्याच वेळात तोही गतप्राण झाला.
तानाजी पडल्यावर मराठी सैन्यात चल बिचल झाली आणि त्यांचा धीर सुटतो की काय म्हणुन सूर्याजी पुढे झाला आणि त्याने त्याना धीर देवून युद्धास परावृत्त केले.झाले ........
विलक्षण अशा जोशात सर्व मराठे लढले मोगली सैन्याचा धीर पुरता खचला आणि त्यानी शरणागती पत्करली......शेवटी काय???
गड आला पण सिंह गेला......
.
.
.
आणि तो दिवस होता ४ फेब्रुवारी १६७० ची रात्र आणि ५ फेब्रुवारी १६७० ची पहाट................!!!

1 comment:

  1. Just completed "Paavan Khind" by Ranjeet Desai. It describes gallentry shown by Baaji Prabhu. Tanajee Too was a great Maratha. Salute to the maratha Hero.

    ReplyDelete